शाळेतील जीवन

शालेय शिक्षणासोबत संस्कार, संगीत, साधना आणि श्रम – आश्रमातील एक समृद्ध दिनक्रम.

अध्याय पहिला

शालेय शिक्षण

जीवनशाळेतील मुले नियमित शालेय शिक्षण घेतात. शाळेत जाण्या-येण्यासाठी गाडीची सुविधा आहे.

तज्ज्ञ शिक्षकांकडून मार्गदर्शन, कौशल्य विकास कार्यक्रम आणि व्यक्तिमत्त्व विकासाचे धडे यांमुळे मुलांचा सर्वांगीण विकास होतो.

पुस्तके स्वीकारताना विद्यार्थी
सभागृहातील अभ्यास सत्र

अध्याय दुसरा

संस्कार

रामरक्षा, नित्य हरिपाठ आणि साप्ताहिक व्याख्याने हा दिनक्रमाचा भाग आहे. विविध भागवत सप्ताहांमध्ये विद्यार्थी सहभागी होतात.

व्यवहारिक जीवनमूल्ये, शिस्त आणि श्रमप्रतिष्ठा यांचे धडे मुलांना रोजच्या जगण्यातून मिळतात.

डोंगरावरील मंदिराजवळ विद्यार्थी
संतांचे मार्गदर्शन घेताना विद्यार्थी

अध्याय तिसरा

संगीत व कीर्तन

पखवाज आणि हार्मोनियमचे प्रशिक्षण, अभंग-भजन गायन आणि पठण, तसेच कीर्तन व प्रवचनाची तयारी करून घेतली जाते.

आतापर्यंत सुमारे ३० विद्यार्थी कीर्तनकार झाले आहेत.

हार्मोनियम वाजवताना संगीत शिक्षक
रात्रीचे भजन सत्र

अध्याय चौथा

साधना व आरोग्य

योग, प्राणायाम आणि ध्यान यातून मन व शरीर निरोगी राहते. खेळण्यासाठी मोकळे मैदान आहे.

मुलांना उत्तम प्रकारचा सकस आहार दिला जातो.

हिरवळीवर ध्यानस्थ विद्यार्थी
विद्यार्थ्यांना भोजन वाढताना

अध्याय पाचवा

निसर्ग व श्रम

निसर्ग शेती आणि पर्यावरण – जल, जंगल, जमीन – याविषयी जागरूकता निर्माण केली जाते.

शाळेच्या परिसरात स्वप्रयत्नातून सुमारे २५०० वृक्षांची लागवड व संवर्धन करून छोटे जंगल उभे राहिले आहे.

मुलांसोबत वृक्षारोपण
परिसरातील झाडे व वसतिगृह

अध्याय सहावा

उन्हाळी संस्कार शिबिर

गेल्या १७ वर्षांपासून दर उन्हाळ्यात ग्रामीण भागातील मुलांसाठी पंधरा दिवसांचे संस्कार शिबिर घेतले जाते. आतापर्यंत सुमारे २००० विद्यार्थी सहभागी झाले आहेत.

अभंग, कीर्तन, प्रवचन, हरिपाठ, हनुमान चालीसा, योग-प्राणायाम, मान्यवरांची बौद्धिके, खेळ, कला आणि संगीत – असे जीवन समृद्ध करणारे विविध घटक शिबिरात असतात.

शिबिरातील भजनाचा सराव
वसतिगृहासमोर शिबिरातील मुले

येथे काय शिकवले जाते?

पखवाजहार्मोनियमकीर्तनप्रवचनअभंग-भजनहरिपाठरामरक्षाहनुमान चालीसायोग-प्राणायामकला-क्रीडानिसर्ग शेतीपर्यावरण जागरूकतावैज्ञानिक दृष्टिकोन

❁ निमंत्रण ❁

प्रवेश सुरू आहे

गरीब, होतकरू व निराश्रित बालकांसाठी शालेय शिक्षणासोबत संस्कारमय निवासी शिक्षणाची संधी. प्रवेशासाठी आजच संपर्क साधा.